शैक्षणिक बँकेत नोंदणी करण्यात महाराष्ट्राने अव्वल क्रमांक पटकावला
नव्या शिक्षण धोरणानुसार, विद्यार्थ्यांना त्यांच्या परफॉर्मन्सनुसार ‘क्रेडिट’ दिले जाणार आहे. हे क्रेडिट जमा ठेवण्यासाठी देशपातळीवर ‘अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट’ची निर्मिती करण्यात आली आहे.
या शैक्षणिक बँकेत नोंदणी करण्यात महाराष्ट्राने अव्वल क्रमांक पटकावला असून राज्यातील २५७ उच्च शिक्षण संस्थांनी या बँकेत सहभाग घेतला आहे. तर अन्य राज्यांतील शिक्षण संस्थांचा अत्यल्प तर काही राज्यांचा नगण्य सहभाग दिसून येत आहे.
दरम्यान, सर्वच राज्यांमधील उच्च शिक्षण संस्थांनी क्रेडिट बँकेत आपल्या महाविद्यालयांची नोंदणी वाढवावी, असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेले आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणात विद्यार्थ्यांना क्रेडिट देण्याची सोय करण्यात आली आहे.
हे क्रेडिट त्यांना बँकेत जमा ठेवून केंव्हाही पुढील शिक्षणासाठी वापरता येणार आहेत. परंतु, त्यासाठी ते ज्या महाविद्यालयात शिकत आहेत, त्या महाविद्यालयाने यूजीसीच्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. २०२१ पासून या बँकेत नोंदणीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यात आतापर्यंत महाराष्ट्रातील २५७ उच्च शिक्षण संस्थांनी नोंदणी केली आहे.
त्यापाठोपाठ ४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी स्वत:चे अकाउंट निर्माण केले आहे. परंतु, भारतातील अन्य राज्यांमधील शिक्षण संस्था अद्यापही नोंदणीबाबत उदासीन आहेत. त्यामुळे यूजीसीने १६ जुलै रोजी सर्व राज्यांना पत्र पाठवून सहभाग वाढीचे निर्देश दिले आहेत.
प्रत्येक महाविद्यालयात नेमा ‘एबीसी सेल’
विद्यार्थ्यांचे क्रेडिट जमा करुन त्यांना त्या क्रेडिटचा फायदा मिळवून देण्यासाठी महाविद्यालयांची एबीसी पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांनीही पोर्टलवर नोंदणी करुन एबीसी आयडी मिळविणे आवश्यक आहे.
हा सहभाग वाढविण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात ‘एबीसी सेल’ निर्माण करावा, या कामासाठी एका प्राध्यापकाची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक करा, त्यांचे मोबाईल क्रमांक, इमेल दर्शनी भागात झळकवा, असे निर्देश यूजीसीने दिले आहेत. तसेच प्रवेश अर्ज, परीक्षा अर्जांवरही विद्यार्थ्यांचे एबीसी आयडी सक्तीचे करा, वेळप्रसंगी विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावरही एबीसी आयडी लिहिणे बंधनकारक करा, असेही निर्देश आहेत.
सहभागी महाविद्यालये
महाराष्ट्र : २५७, आंध्र प्रदेश : १८४, तामिळनाडू : १७१, कर्नाटक : १४२, मध्य प्रदेश : १३६, गुजरात : १२३, उत्तर प्रदेश : १२२, राजस्थान : ११०, ओडिशा : ८२, प. बंगाल : ७२, हरयाणा : ७२, केरळ : ६५, तेलंगणा : ५२, छत्तीसगड : ५०, उत्तराखंड : ४३, पंजाब : ४२, आसाम : ४२, बिहार : ३९, झारखंड : ३८, हिमाचल प्रदेश : २९, जम्मू काश्मिर : २०, मणिपूर : १३, अरुणाचल प्रदेश : ११, मेघालय : ११, सिक्कीम : ९, नागालँड : ८, त्रिपुरा : ५, गोवा : ५, लदाख : २, मिझोराम : २.
------------------------------------------------------------------------------------
Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |
We bring you the fastest and most relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alerts on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव>
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.

